Wednesday, November 23, 2011

Corrupted Staff in the Offices of Director and Joint-directors, Higher Education


Pune -

ही एक अत्यंत निर्लज्जास्पद  गोष्ट आहे की पुणे रेल्वे स्टेशनजवळील संचालक, उच्च शिक्षण (Director of Higher Education) यांच्या कार्यालयातील काही कर्मचारी तसेच त्यांच्या अखत्यारीतील सहसंचालक, उच्च शिक्षण (Joint-directors of Higher Education) यांच्या कार्यालयांतील काही कर्मचारी वरिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक व कार्यालय अधीक्षक यांच्याशी अत्यंत उर्मटपणे वागतात आणि त्यांच्याकडून अनुदान मंजुरी, ना हरकत प्रमाणपत्रे देणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या पदनिश्चिती, मुलाखती रोखून ठेवणे, पगार व भत्ते सुरु करणे, थकीत पगार व भत्त्यांची देयके मंजूर करणे, सहाव्या वेतन आयोगाची देयके तयार करून देणे अशा प्रत्तेक कामासाठी पैसे मागतात.

मी महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयांतील प्राचार्य, प्राध्यापक व कार्यालय अधीक्षकांना विनंती करतो की त्यानी संचालक व सहसंचालक, उच्च शिक्षण कार्यालयांतील कर्मचारी व अधिकारी यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे या वेब पोर्टलवर नोंदवावीत.

No comments:

Post a Comment